मित्रहो नुकताच काही दिवसांपूर्वी राज्यसेवा 2017 पूर्व परीक्षेचा प्रत्येकाला डोळे विस्फारयला लावणारा कट ऑफ लागला, स्पर्धा परीक्षेतील जुन्या जाणकार तज्ञ मार्गदर्शकांनाही याचा अंदाज आला नाही, अशावेळी आमच्यासारखे नवख्या लोकांचाही अंदाज चुकने साहजिक होते. तरीही जास्त कट ऑफ सांगून कमी लागण्यापेक्षा कमी सांगून जास्त लागला त्यामुळे एवढं काही वाटलं नाही.
खरंतर ही बाब आता भूतकाळात जमा झाली आहे, पण आपली भविष्यातील वाटचाल अडथळे विरहित असावी असे वाटत असेल तर आपण आपल्या भूतकाळात डोकावणे आवशक आहे. खऱ्या अर्थाने भूतकाळातील सकारत्मक / नकारात्मक गोष्टीच आपणास वर्तमान आणि भविष्यातील गोष्टींसाठी मार्गदर्शन करत असतात. म्हणून ठरवले की आपण कुठे कमी पडलो याचा मागोवा घेणे खूप गरजेचं आहे. बऱ्याच विचारांती खालील काही बाबी माज्या लक्षात आल्या ज्या राज्यसेवा पूर्व 2017 चा कट ऑफ वाढण्यास कारणीभूत आहेत.
1) CSAT पेपरची कठिण्यपातळी:
MPSC ने 2013 पासून राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी CSAT हा पेपर सुरू केला आहे, त्यानंतर प्रत्येक वर्षी या पेपरची काठिण्यपातळी ही अवघड होती, मात्र यावर्षीचा CSAT पेपर हा निश्चितच मागील सर्व CSAT पेपर पेक्षा तुलनेने 30 ते 35 टक्के सोपा होता. त्यामुळे अगदी नवख्या मुलांनाही या पेपर मध्ये जास्त मार्क्स मिळाले.
2) अंतिम उत्तरतालिका:
प्रथम उत्तरतालिकेनंतर जाहीर झालेल्या अंतिम उत्तरतालिकेनुसार GS चे 4 व CSAT च्या 6 प्रश्नांची उत्तरे बदलली तर CSAT मधील 4 प्रश्न रद्द झाले. त्यामुळे जवळपास सर्व मुलांच्या गुणांमध्ये 10 ते 15 मार्कांनी वृद्धी झाली. आधीच जास्त मार्क असणाऱ्यांना यामुळे आणखी मार्क्स मिळाले व हे 10 ते 15 गुण महत्वाचे ठरले.
3) वय वाढ :
2016 च्या शेवटी व 2017 च्या सुरवातीस शासनाने MPSC च्या वयोमर्यादेत स्वागतार्ह अशी वाढ केली. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा फायदा खूप मोठ्या लोकांना झाला. जे लोक MPSC वयोमर्यादेमुळे सोडून गेले होते ते पुन्हा इकडे वळले, तर ज्यांची मुदत संपत आली होती त्यांना नवसंजीवनी मिळाली. पण याचा सर्वात मोठा फायदा कोणाला झाला असेल किंवा घेतला असेल तर ते म्हणजे सध्या रुजू असलेले काही क्लास 1 क्लास 2 अधिकारी वर्ग. हा डीबार झालेला अनुभवी वर्ग पुन्हा सक्रिय झाला. हेही एक सर्वात महत्वाचे कारण होते.
वरील 3 महत्वाचे मुद्दे आहेत जे कट ऑफ वाढण्यास कारणीभूत ठरले, याशिवाय स्पर्धा परिक्षांबाबत होणारी जागरूकता, तंत्रज्ञानाचा अभ्यासासाठी योग्य वापर, बदलणारी अभ्यासपद्धती यामुळेही काही प्रमाणात या गोष्टीला हातभार लावला आहेच.
मित्रहो आपणासही एकच सांगणे आहे की आपणही आपल्या चुकांचे सिंहावलोकन करा, मागील चुकांचा अभ्यास करून त्या टाळण्याचा कमी करण्याचा प्रयत्न करा.
पुढील राज्यसेवा पूर्व परीक्षेला अजून खूप वेळ आहे, तेंव्हा आपण योग्य असे लॉंग टाईम नियोजन करून, वेळापत्रक आखून ते काटेकोरपणे अंमलात आणून अभ्यास केला तर आपणही पुढील वर्षी यशस्वी होऊ शकता यात दुमत नाही.
चला तर मग आतापासूनच कामाला लागा....
No comments:
Post a Comment