मराठी व्याकरण मराठी भाषेच्या इतिहासा


मराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने


मराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने ग्रांथिक साधने,कोरीव लेख-शिलालेख,ताम्रपट;लोकसाहित्य, अप्रत्यक्ष साधने
प्रमाण साधने कागदपत्रांचा आधार शासकीय आदेश, राजाने काढलेली फर्माने आज्ञापत्रे, करारनामे, तहनामे आपापसातील पत्रव्यवहार दुय्यम साधने तवारिखा,बखरी,पोवाडे,स्रोत्रे

ऐतिहासिक उत्पत्ती


वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषेच्या स्वरुपावरुन प्रत्येक भाषेतील काही वैशिष्टे मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असा विचार अनेक अभ्यासक मांडतात मात्र त्यांच्यात एकमत अजूनही दिसून येत नाही.


मराठी भाषेच्या बाबतीत काही मते अशी-
वेदकालीन

वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरुन मराठीचा जन्म झाला. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. आणि इतर प्राकृत भाषेच्या रुपाशी जुळणारे विशेष सापडतात. पण एवढ्यावरुन अभ्यासक तिला प्राकृत पासुन निर्माण झाली असे मानण्यास तयार नाहीत. वेदकाळापासून इ.स.५०० - ७०० पर्यंत वेदकालीन प्राकृत भाषा समाजात वापरात नव्हत्या त्यामुळे हे मत योग्य वाटत नाही.

वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरुन मराठीचा जन्म झाला. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. म्हणजे वेदपुर्वकालीन भाषेत साधे स्वर, संयुक्त स्वर, आणि अर्धस्वर दिसतात. तिन्हीपैकी उच्चारदृष्ट्या अर्धस्वर हे प्रथमचे असावेत. अर्धस्वरापासून साधे स्वर निर्माण झाले आणि शेवटी संयुक्त स्वर असा क्रम आहे. तो संस्कृत मधे नाही, असे म्हणतात. आणि अभिजात संस्कृत हे व्याकरण, छंद,मात्रा, गण, यामुळे ते परिपूर्ण होते. वेदात वेदपुर्वीचे शब्द आहेत पण ते अभिजात संस्कृत मधे नाहीत त्या पुर्वीच्या भाषेचा प्राकृत आणि मराठी भाषेशी संबध दाखवण्याचा प्रयत्न या विषयाचे अभ्यासक करतात.


तमिळ-मराठी भाषा संबंध


मराठी भाषेचा ज्ञात इतिहास साधारणपणे हजार ते तेराशे वर्षांचा आहे. कन्नड आणि तेलुगू भाषा आणखी पाचशे वर्ष वरिष्ठ आहेत असे मानले जाते. मराठीच्या अगोदर प्राकृत-अपभ्रंश आणि महाराष्ट्री प्राकृत ह्यांचा वावर सुमारे १५०० वर्षे होता असे मानले तरी त्यापूर्वी महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जायची हा प्रश्न उरतोच. मराठी भाषेत त्या काळात असणारे जे स्थानिक द्रविड कुलोत्पन्न शब्द होते, ते आजही वापरात आहेत, "देशी" अशा अर्थाने भाषातज्ज्ञ त्यांचा उल्लेख करतात. डॉ.पां.दा. गुणे व भाषाशास्त्रज्ञ विल्सन ह्याने मराठीतील देशी शब्दांचे ॠण मान्य केले आहे. अनुलोम-प्रतिलोम पद्धतीने प्रत्येक मराठी शब्दाचा संबंध संस्कृतशी जोडणे तार्किक वाटत नाही, त्यामुळे भाषेचे जाणकार श्री.केतकर ह्यांचे मत संस्कृत देखील स्थानिक भाषांपासून तयार झाली असावी असे आहे, जे आत्यंतिक स्वरूपाचे वाटते.

भाषातज्ज्ञ विश्वनाथ श्री. खैरे ह्यांनी "संमत" सिद्धान्ताद्वारे मराठीचे मूळ तमिळ भाषेमध्ये शोधले असल्याचे त्यांनी द्रविड महाराष्ट्र, अडगुलं मडगुलं (पुस्तक) या पुस्तकांत सांगितले आहे. डॉ. श्री.ल. कर्वे ह्यांचेही मत तसेच आहे. तमिळ आणि जुनी मराठी (साधारणपणे सातशे ते आठशे वर्षापूर्वीची- संत ज्ञानेश्वरांच्या काळातील) ह्यांचे पदक्रम, व्याकरण, वाक्यरचना ह्यांत खूपच साम्य आहे. वापरात असलेले मराठी शब्द थोड्याफार फरकाने आजही तमिळमध्ये दिसून येतात. त्यामुळे फक्त संस्कृत आणि प्राकृत ह्याच भाषांच्या आरोपणांतून मराठीचा जन्म झाला हा तर्क योग्य वाटत नाही. तर त्या उलट खैरे ह्यांचा
संमत सिद्धान्त अधिक स्वीकारार्ह वाटतो. (संमत=संस्कृत-मराठी-तमिळ).

संस्कृतपासून मराठी


संस्कृतपासून मराठी भाषा निर्माण झाली असे एक मत आहे. संस्कृतपासून मराठी निर्माण झाली नाही कारण वर्णांने बदल, प्रयोगातील वेगळेपणा, उच्चारणातील फरक, वाक्प्रचार, इत्यादी बाबतीत दोन्हीही भाषेत खूप वेगळेपणा आहे. जे थोडेफार साम्य आहे ते पुरेसे नाही.


भाषाशुद्धी चळवळ


स्वातंत्र्यवीर सावरकर १९२३पासून १९३७पर्यंत रत्नागिरीला स्थानबद्ध होते. प्रत्यक्ष राजकारणात भाग घ्यायला त्यांना बंदी होती. तेव्हा त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी यांवर टीका करणारे पुष्कळ लेख 'किर्लोस्कर' मासिकातून लिहिले. १९२४मध्ये 'केसरीत' 'मराठी भाषेचे शुद्धीकरण' ही लेखमाला लिहिली. याच शीर्षकाची पुस्तिका नंतर प्रकाशित झाली.

ही लेखमाला सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असताना लिहिली असल्यामुळे आणि सावरकरांबद्दल सुशिक्षित समाजास आदर आणि कुतूहल वाटत असल्यामुळे त्यांच्या सांगण्याचा अनेकांवर प्रभाव पडला. भाषाशुद्धी करणे हे राष्ट्रकार्यच आहे. त्यामुळे आपण जरी राजकारणात भाग घेऊन इंग्रजी राजवटीचा प्रतिकार करू शकलो नाही तरी सावरकर सुचवितात त्याप्रमाणे

2 comments:

  1. Titanium White octane | Shop Online | Tioga
    Explore the titanium bikes world of online luxury at Tioga titanium camping cookware International, Inc. graphite titanium babyliss pro from the stylish and premium ford edge titanium brands at Tioga International. venza titanium glow

    ReplyDelete